AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Protest : पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना कोणत्या देशात? ढाका सोडून कुठं गेल्या?

Bangladesh Protest : पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना कोणत्या देशात? ढाका सोडून कुठं गेल्या?

| Updated on: Aug 05, 2024 | 4:20 PM
Share

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ढाका शहर सोडून त्या भारतात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकूणच आराजकता पसरल्यानंतर शेख हसिना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसिना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका शहर सोडलं आहे. या संपूर्ण घटनेने बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बांग्लादेशचे लष्कर प्रमुख लवकरच मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. बांग्लादेश सध्या गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ढाका शहर सोडून त्या भारतात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकूणच आराजकता पसरल्यानंतर शेख हसिना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये रविवारी जोरदार निदर्शने झाली. या निदर्शनात आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आंदोलकांनी ‘लाँग मार्च’ काढला. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर बांगलादेश सरकारने सोमवारी इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. याच्या एक दिवस आधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये देशाच्या विविध भागात झालेल्या संघर्षात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

Published on: Aug 05, 2024 04:18 PM