AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | ऑगस्ट महिन्यात बँकांना बंपर सुट्ट्या, तब्बल अर्धा महिना बँका बंद राहणार

Breaking | ऑगस्ट महिन्यात बँकांना बंपर सुट्ट्या, तब्बल अर्धा महिना बँका बंद राहणार

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 2:11 PM
Share

बँकेचे एखादे काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण ऑगस्टमध्ये बँकांना बंपर सुट्ट्या (Bank Holiday in August 2021) आहेत.

बँकेचे एखादे काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण ऑगस्टमध्ये बँकांना बंपर सुट्ट्या (Bank Holiday in August 2021) आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी आपले काम अडकून पडू नये. ऑगस्ट महिन्यात जेव्हा आपण बँकेत जाल तेव्हा कदाचित आपल्या राज्यात बँकेची सुट्टी असू शकते आणि आपल्याला बँकेच्या गेटवर लॉक लटकलेला आढळू शकेल. अशा परिस्थितीत ऑगस्टमध्ये बँका केव्हा बंद होतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आरबीआय वेगवेगळ्या राज्यांनुसार बँकांच्या सुट्ट्या जाहीर करते. ऑगस्ट 2021 मध्ये बँका एकूण 15 दिवस (RBI Bank Holidays List) बंद राहतील. दर रविवारी आणि महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय प्रत्येक राज्यात वेगवेगळे सण, जत्रा किंवा कोणत्याही विशेष कार्यक्रमामुळे त्या राज्यातील बँकांमध्ये सुट्टी असते.