भल्या मोठ्या अस्वलांची थेट मंदिरात एन्ट्री… स्वतः गेट उघडलं, प्रसादावर मारला ताव अन् …
गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये-जा करत असतात. मात्र आता तर हद्दच झाली असून एक मादा अस्वल आणि तिची चार पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद
बुलढाणा, २९ फेब्रुवारी २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शिवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये-जा करत असतात. मात्र आता तर हद्दच झाली असून एक मादा अस्वल आणि तिची चार पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल कंपनी मंदिर परिसरात भटकत होती, पिण्यासाठी मुबलक पाणी असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. मात्र ही अस्वल कंपनी थेट महादेव मंदिरात घुसली आणि भक्तांनी ठेवलेला महाप्रसाद खाऊन तेथून धूम ठोकली. या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आला असल्याने सध्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले, त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होते.