बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी… विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता…
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विलास घुले यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. मंगळवारी तर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका संशयिताने पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे नाव घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आले आहे. IPS वेंकटरामा यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष तपास पथक काम करत आहे. विलास घुले याची हत्या झाली त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन गट एकमेकांना दगडं, काटेच्या बाट्लया आणि इतर घातक वस्तूने हाणामारी करत असल्याचं दिसून आलं आहे. या फुटेजमध्ये तेरा ते चौदा जण दिसत असून पोलिस प्रशासन विविध दिशांनी तपासाला लागलं आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Jun 25, 2026 02:02 PM
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?