Beed News : ‘तुमची मुलगी मला द्या…’, गावगुंडाकडून शिक्षकाला जबर मारहाण, व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरून जाल
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस काही न काही खूण, हल्ला आणि जबर मारहाणीच्या घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गावगुंडाची दहशत दिवसेंदिवस चांगलीच वाढत असल्याचे अशा प्रकारावरून समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका गावगुंडाकडून शिक्षकाला जबर मारहाण कऱण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमची मुलगी मला द्या, असं म्हणत या गावगुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकंच नाहीतर शिक्षकाकडे त्याच्या मुलीची मागणी करत गावगुंडाकडून शिक्षकालाच बेदम मारहाण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शिक्षकाच्या गाडीवर थेट ट्रॅक्टर घालत त्यांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. या महिला वकिलाला गावातल्याच सरपंचासह इतर काही माणसांकडून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली होती. या जबर मारहाणीनंतर या वकील महिलेचं अंग काळंनिळं पडलं आहे. लाऊडस्पीकर लावू नये, अशी तक्रार केल्यानं या महिला वकिलाला अशी जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली होती.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

