Beed Protest : बीडमध्ये खळबळ! कुठं रास्तारोको, कुठं लालपरीची तोडफोड, आंदोलनाला हिंसक वळण; नेमकं घडलंय काय?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कोरडेवाडी येथे साठवण तलावाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. काही तरुणांनी महामंडळाच्या बस फोडल्या असून, पोलीस आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कोरडेवाडी येथे साठवण तलाव करण्याच्या मागणीसाठी गेले अनेक दिवसांपासून विविध आंदोलनं सुरू आहेत. याच मागणीसाठी आज केज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तीन तासांहून अधिक काळापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे शहराच्या चारही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांकडून रस्त्यावर थांबलेल्या महामंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. बसेसच्या काचा फोडण्यात आल्याची दृश्ये समोर आली आहेत. पोलीस प्रशासन आंदोलकांना समजावून शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.
Published on: Oct 14, 2025 05:39 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

