BEST : मुंबईकरांनो… तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी, येत्या 8 मे पासून….
बेस्ट उपक्रमाने बसभाडेवाढीबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मंजूरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला होता. या मंजुरीनंतर आता बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीची तयारी सुरू केली आहे.
मुंबईत स्वस्तात हव्या त्या ठिकाणी सोडणाऱ्या आणि मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससंदर्भात एक मोठी बातमी आहे. तुम्ही देखील मुंबईत बेस्ट बसने प्रवास करत असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुमच्या खिशाला काहिशी कात्री लागणार असल्याचे दिसतेय. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे ८ मे पासून भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बेस्ट परिवहन प्राधिकरणाकडून अद्याप या भाडेवाढीसंदर्भात कोणतीही लेखी प्रत मिळालेली नाही. त्यामुळे ज्यावेळी ही प्रत मिळेल. त्यानंतर या आठवड्यात बेस्टच्या भाडे दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्हाला लवकरच बेस्ट बसच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान, मुंबईत फिरताना सध्या असणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसचे सध्याचे भाडे अतिशय कमी असल्याने मुंबईकरांची बेस्टबसला प्रथम पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. मात्र याच बसभाड्यात आता वाढ होणार आहे.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?

