BS Koshyari Parbhani | नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून कौतुक

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील (vasantrao naik agriculture university)  प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर ते बांबू लागवड प्लॉटला (Bamboo plot) भेट देणार आहेत. शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI