Bharatbhau Bahekar : माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास

बहेकार यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यमंत्री म्हणून वन, बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळली होती. माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकारांनी भाजपचे भैरसिंह नागपुरे यांचा पराभव केला होता. आमगाव खुर्दचे सरपंचही होते

शुभम कुलकर्णी

|

Aug 10, 2022 | 11:26 AM

गोंदिया : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री (Farmer Minister) भरतभाऊ बहेकार (Bharatbhau Bahekar) यांचं मंगळवारी निधन (Death) झालं. त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा निवासी अलेले भरतभाऊ बहेकार यांना गोंदियाच्या बजाज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बहेकार यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मंगळवारी रात्री उपचारादरम्यान दरम्यान माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांचं निधन झालं. गोंदिया जिल्हा काँग्रेस समितीच्या मार्गदर्शक मंडळात होते. राजकीय क्षेत्रात सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बहेकार यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यमंत्री म्हणून वन, बांधकाम विभागाची जबाबदारी 1990-95 दरम्यान सांभाळली होती. माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांनी भाजपचे भैरसिंह नागपुरे यांचा पराभव केला होता. बहेकार हे सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्दचे ते सरपंचही होते. त्यांनी सालेकसा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें