शाह यांच्या आरोपांची परतफेड ठाकरे दामदुप्पट व्याजाने करतील, कोणी दिला इशारा
शिवसेना ही लढवय्या सैनिकांची सेना आहे. बाळासाहेबाचे पूत्र असलेले उद्धव ठाकरे पुण्यातील मेळाव्यात अमित शाह यांच्या वक्तव्यांची दा्मदुप्पट व्याजाने वसुली करतील असे शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे गटाचा पुण्यात मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे पुण्यात आज कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागले आहे. उध्दव ठाकरे यांच्यावर पुण्याच्या कार्यक्रमातच गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी टिका केली होती. त्यात आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा होत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा जोश आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र आहेत,त्यामुळे ते कुणाची उधार उसनवारी ठेवत नाहीत, अमित शाह यांची परतफेड ते दामदुप्पट व्याजाने करतील असे जाधव यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या सभेने पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला अनुकूल परिस्थिती होत आहे. येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News