घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत…
मांसाहारींना घर देणार नाही अशा वादग्रस्त जाहिरातीमुळे चर्चेत आलेले बिल्डर भावेश कावरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या जाहिरातीमुळे कावरे वादात सापडले होते, मनसेने त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही केले होते. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वादग्रस्त जाहिरातीमुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक (ब्रोकर) भावेश कावरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही भेट शिवतीर्थावर होणार आहे. ताडदेव येथील एका घराच्या जाहिरातीत भावेश कावरे यांनी मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नसल्याचे म्हटले होते. या जाहिरातीमुळे ते चांगलेच टीकेचे धनी ठरले. या जाहिरातीनंतर राज्यातून आणि समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मनसेने भावेश कावरे यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत जोरदार आंदोलन केले होते.
चिकनची माळ घराच्या नावफलकाला घालून मनसे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर भावेश कावरे यांनी या प्रकरणी माफी देखील मागितली होती आणि यावर स्पष्टीकरणही दिले होते. आता या पार्श्वभूमीवर ते स्वतः राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अशी प्रथमिक माहिती आहे. या भेटीदरम्यान राज ठाकरे भावेश कावरे यांच्याशी काय चर्चा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे भावेश कावरे यांच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असे दिसून येते
Published on: Aug 16, 2026 12:52 PM
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...

