AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय

भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 26, 2026 | 11:45 AM
Share

भिगवण कथित अपहरण प्रकरणात तरुणीने इंदापूर न्यायालयात आपला जबाब बदलला आहे. सुधारगृहातील मुक्कामानंतर तिने आई आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी तिने आईसोबत जाण्यास नकार दिला होता. आता न्यायालयाने तिचा ताबा आई आणि मामांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

भिगवण कथित अपहरण प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणीने आता कोर्टात आपला जबाब बदलला आहे. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर तिने आपल्या आई आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यापूर्वी बारामती न्यायालयासमोर हजर असताना, या तरुणीने (वैष्णवी) आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार तिला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. सुधारगृहातील मुक्कामानंतर तिच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येते.

आज इंदापूर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयापुढे हजर करण्यात आले. कोर्टाने तिला कोणाकडे जायचे असे विचारले असता, तिने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तिच्या या इच्छेनुसार, मेहेरबान न्यायालयाने तिचा ताबा तिची आई आणि मामा यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केला आहे.

Published on: Feb 26, 2026 11:45 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या