स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच…धक्कादायक माहिती समोर!
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे,
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.
आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची धक्कादायक माहितीस समोर आली आहे. त्याला गावातून 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं, त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे. सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेही हे या ठिकाणी राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
या आरोपीने त्याच्या स्वतःच्या मुलीवरसुद्धा अत्याचार केले होते, अशीही खळबळजनक माहिती समोर येत आहे. याच क्रूर आरोपीने गावातील 65 वय असणाऱ्या महिलेवरही बलात्कार केला होता. गावातील शेतात जाणाऱ्या अनेक महिलांवर त्याची वाईट नजर असायची. अनेक वेळा त्याने या महिलांसोबत गैरकृत्य केले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ही प्रकरणं समोर आली नाहीत, असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
Published on: May 03, 2026 05:41 PM
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...

