Priyanka Joshi Speech | 2017 ला कवितेतून मोदींवर हल्लाबोल, आता कृषीकन्येला ठाकरेंकडून मोठं गिफ्ट
प्रियांका जोशी ही चार वर्षापूर्वी शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आली होती. शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. “आमचा बाप कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे, म्हणून कर्जमाफी मागतोय” असं खणखणीत भाषण करणारी प्रियांका त्यावेळी चर्चेत आली होती.
आपल्या कविवेतून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या प्रियांका जोशी (Priyanka Joshi) या तरुणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. धुळ्याची कृषीकन्या प्रियंका जोशीला युवती सेनेच्या (Yuva Sena) बुलढाणा अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्त केलं आहे. युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रियांका जोशीला महत्त्वाचं पद देण्यात आलं.
प्रियांका जोशी ही चार वर्षापूर्वी शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आली होती. शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. “आमचा बाप कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे, म्हणून कर्जमाफी मागतोय” असं खणखणीत भाषण करणारी प्रियांका त्यावेळी चर्चेत आली होती. याशिवाय प्रियांकाने मोदींवर केलेली कविताही खूपच गाजली होती.
प्रियांका जोशीची गाजलेली कविता
अच्छे दिनाने शेतकऱ्यांची कंबरडी मोडली,
आमच्या भाजीपाल्याला भाव ने देता, तुम्ही तुमचीच गाजरं विकली,
तुमचीच सत्ता, तुमचंच सरकार असल्याने, तुम्हाला कुणाचा असणार धाक?
मोदीची तुमच्याही खात्यात आले का हो 15 लाख?
काळा पैसा बाहेर येण्याच्या धुंदीत तुम्ही नोटबंदी केली,
नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी होती
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

