AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnatak Election 2023 | कर्नाटक विधानसभेचा निकाल २०२४ साठी भाजपला अलर्ट? कोणतं असणार आव्हान?

Karnatak Election 2023 | कर्नाटक विधानसभेचा निकाल २०२४ साठी भाजपला अलर्ट? कोणतं असणार आव्हान?

| Updated on: May 14, 2023 | 7:42 AM
Share

VIDEO | २०२४ मध्ये या राज्यात भाजपला झटका बसणार? नेमका काय आहे भाजपला इशारा?

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election 2023) काल लागलेला निकाल हा भाजपसाठी अलर्ट आहे. कारण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपला झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने शिवसेनेसोबत २३ आणि १८ अशा अनुक्रमे जागा जिंकल्या होत्या. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा, २०१९ साली भाजपने १७ जागा जिंकल्यात, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा, २०१९ साली भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच या चार राज्यात एकूण १५८ जागा आहेत. थोडक्यात या जागा हातून जाऊ न देणं हेच भाजपसाठी मोठं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर असणार आहे.

Published on: May 14, 2023 07:42 AM