Special Report | जय बजरंग बली, काँग्रेस जिंकली ! भाजपचं अर्ध कॅबिनेट कर्नाटकनं नाकारलं अन्…
VIDEO | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 25 पैकी 13 मंत्री पराभूत... दिग्गजांना घरचा रस्ता; बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : हनुमान, हिजाब आणि इतर धार्मिक मुद्द्यांना नाकारत कानडी जनतेने काँग्रेसने मांडलेल्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्याला कौल दिलंय. कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या अर्ध्या कॅबिनेटला पराभवाचा आरसा दाखवला आहे. विद्यमान २५ मंत्र्यांपैकी भाजपचे १३ मंत्री पराभूत झालेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रकटलेला बजरंग बलीचा मुद्दा आणि धार्मिक ध्रुवीकरणाला नाकारात कानडी जनतेने काँग्रेसला कौल दिलाय. प्रचारात भाजपने जे मुद्दे घेतले त्याला प्रतिवाद न करता काँग्रेसने सामान्य लोकांच्या मुद्द्यांवर जोर देत राहिली. ज्याचा परिणाम भाजपच दारूण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत भाजपचे मुद्दे होते, हिजाब, मुस्लिम आरक्षण, बजरंग बली, दंगलीचा इशारा, समान नागरी कायदा, मोदींना मिळालेल्या शिव्यांचा आरोप आणि १ ट्रिलीयन अर्थव्यवस्था तर काँग्रेसचे मुद्दे होते, महागाई, बेरोजगारी, जुनी पेन्शन योजना, पदवीधरांना ३ हजार रूपये, भ्रष्टाचार असे होते. निकालपूर्व सर्वेक्षणातून भाजप पराभूत होत असल्याचं चिन्ह होतं आणि आज निकाल समोर आहे… भाजपची कोणती मोफत पॉलिसी जनतेने नाकारली बघा स्पेशल रिपोर्ट…
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

