Devendra Fadnavis | 25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली
राज्यभरात सर्वत्र महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून काल त्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसत आहे. या निकालांवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक आणि कामगिरी केली आहे.
राज्यभरात सर्वत्र महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून काल त्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसत आहे. या निकालांवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक आणि कामगिरी केली आहे. एकूण 29 पैकी तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे, असे त्यांनी नमूद केले.
या विजयामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून भाजप पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे, असेही फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाच्या हातातून निसटून भाजपच्या ताब्यात गेली असून हा बदल राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या यशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून राज्यात आगामी काळात विकासाला अधिक गती देण्याचा विश्वास नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असल्याचेही भाजप नेत्यांनी सांगितले.

