AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?

BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत… काय घडतंय?

| Updated on: Jul 13, 2026 | 11:43 AM
Share

महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार असून राज्याच्या राजकारणात या बैठकीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसेच केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्ताराबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक नेत्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. त्यामुळे बैठकीतील निर्णयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या बैठकीला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये रविंद्र चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बैठकीनंतर कोणते निर्णय समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 13, 2026 11:43 AM

Follow Us