Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लूस्टार संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांच्या विधानावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. महाजन यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या स्तरावर गिरीश महाजन यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ऑपरेशन ब्लूस्टारसारख्या संवेदनशील विषयावर वक्तव्य करताना अधिक सावधगिरी बाळगणे अपेक्षित होते, अशी भावना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लूस्टारचा उल्लेख “काळा दिवस” असा करत, या कारवाईदरम्यान अनेक जण शहीद झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर भाजपकडून महाजन यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, गिरीश महाजन यांना या विषयाची संपूर्ण माहिती नसल्यामुळे किंवा संदर्भाबाबत गैरसमज झाल्यामुळे असे वक्तव्य झाले असावे, असे स्पष्टीकरणही पक्षाकडून दिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महाजन यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, याबाबत भाजपकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 10, 2026 10:38 AM
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले