हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात दाखल झाल्यावर किरीट सोमय्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला.
ही सगळी अक्कल, सुबुद्धी राष्ट्रवादी नेत्यांची कुठे गेली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते, शरद पवार यांच्या आदेशानुसार किरीट सोमय्यांना महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ देऊ नका, तेव्हा मला जेलमध्ये टाकलं होतं. पण आता मला कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेऊ दिलं, ही अक्कल राष्ट्रवादी नेत्यांना लवकर परत आली त्यात मला आनंद आहे, असेही त्यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटावरही निशाणा साधत हसन मुश्रीफ यांच्या सर्व घोटाळ्यांचा सोमय्यांनी समाचार घेतला.