हिंदू सणांना परवानगी देताना सरकारला लकवा का? – Ashish Shelar
हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
मुंबई: हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये (hindu) संभ्रमाचे वातावरण कायम आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
