‘आपला जीव किती आपण बोलतो किती’, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला, बघा नेमकं काय म्हणाले?
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर भाजप नेत्यानं घेतला उद्धव ठाकरे यांचा समाचार अन् दिला सल्ला, बघा व्हिडीओ
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ‘मोगॅम्बो’ असा उल्लेख केला होता. कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असेही वारंवार उद्धव ठाकरे विरोधकांना आपल्या भाषणातून ठणकावून सांगताना दिसतात. या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना कोणाला संपवायची आहे, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची पूर्ती वाट लागलेली आहे. उद्धव ठाकरे हे समोरच्या राजकीय नेत्याविषयी कोणत्याही भाषेत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. असंस्कृत मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झालेली आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. यासह पुढे ते असेही म्हणाले की, आपला जीव किती आपण बोलतो कीती, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

