Marathi News Videos Bjp leader girish bapat opposed some rules in pune mini lockdown
Pune Mini Lockdown | पुण्यात मिनी लॉकडाऊन, भाजपचा निर्बधांना विरोध, बससेवा कमी क्षमतेनं सुरु ठेवण्याची मागणी
पुणे : पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी […]
पुणे : पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे.