‘अनिल परब यांचा उन्हाळा आणि पावसाळा तुरूंगात’, कुणी केलं भाकीत?
VIDEO | 'सदानंद कदम यांना ईडीकडून अटक होणं म्हणजे अनिल परब यांनी बॅग भरायला सुरू करायला हवी', कुणी दिली खोचक प्रतिक्रिया
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांची सावली आहे. त्यामुळे अनिल परब जसं सांगणार तसं सदानंद कदम करत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले तर सदानंद कदम यांना ईडीकडून अटक होणं म्हणजे अनिल परब यांनी बॅग भरायला सुरू करायला हवी आणि आता त्यांचा उन्हाळा, गरमी आणि अंधारात जाणार असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. झालेली कारवाई ही पक्षःपातीपणाची कारवाई असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, ईडी, सीबीआय अशा यंत्रणा कोणत्याही पक्षाचा झेंडा बघून कारवाई करत नाही. जर भ्रष्टाचार झाला असेल तर ते कारवाई करतात, असे बोलत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

