आदित्य ठाकरे खरंच बाळासाहेबांचे नातू? नितेश राणे यांनी का उपस्थित केला सवाल?
VIDEO | भाजप नेते नितेश राणे हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'आदित्य ठाकरे खरंच बाळासाहेबांचे नातू आहेत का? हे पुरावे मागितले तर चालतील का?', असा सवाल करत केली जहाल टीका, बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले नितेश राणे
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखं मुंबईत आणण्यात येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे. दरम्यान, यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, अशी मागणी केली. यावरूनच नितेश राणे हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक होत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहाल टीका केली. अफझलखानाचे वंशजच शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करू शकतात. असे म्हणत आदित्य ठाकरे खरंच बाळासाहेबांचे नातू आहे का? पुरावे मागितले तर चालतील का? असा सवाल केला आहे. आमच्यासारख्या मावळ्यांना ही वाघनखं चांगल्या प्रकारे वापरता येतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.
Published on: Sep 30, 2023 05:17 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
