Pankaja Munde : ‘धनुभाऊंसाठी कमळ असतं तर…’, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंसाठी घेतलेल्या सभेत मोठं वक्तव्य
परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांचं चिन्ह कमळ असतं तर बरं झालं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर संभ्रम निर्माण होईल असं वक्तव्य करू नये, असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी करून त्यांना सल्लाच दिलाय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. असं म्हणत त्यांना मत देण्याचं आवाहन जनतेला केलंय. तर बीड जिल्ह्यातील परळीतून धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी धनंजय मुंडे त्यांच्या सोबत एकाच मंचावर असतानाच त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. आदला-बदलीमध्ये धनंजय मुंडे यांनी कमळच घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं सांगत पंकजा मुंडे यांनी घड्याळ चिन्हावर भाष्य केलं. भाजप समर्थकांना कमळाचं चिन्ह दाबण्याची सवय आहे. तरी दुःख चिन्हाचं असलं तरी माणूस आपला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी विधानसभेत पहिल्यांदाच ४० वर्षांनंतर कमळ चिन्ह गायब झालंय. कारण यापूर्वी इथेला पारंपारिक सामना हा कमळ विरूद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा असायचा. मात्र यंदा अजित पवार आणि धनंजय मुंडे भाजपसोबत गेल्यानंतर ही जागा विद्यमान आमदार म्हणून घड्याळ या चिन्हासाठी सुटली आहे. दरम्यान, आता युती आहे पुढे काय होईल माहिती नाही, असं वक्तव्य ही पंकजा मुंडे यांनी केलं. त्यामुळे त्यांचं हे विधान देखील सध्या चर्चेत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

