Raosaheb Danve Video : कार्यकर्त्यांनो… नीट बघा नेते काय करतात! रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ व्हायरल
भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्यासोबत फोटो काढताना रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचे सांगितले जात आहे. बघा व्हायरल होणारा व्हिडीओ
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काहीसा दुरावा निर्माण झाला होता. मात्र रावसाहेब दानवे यांच्या एका व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पॅचअप झाल्याचे दिसतंय. सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील नेते एकमेकांचा प्रचार करताना दिसताय. अशातच रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर रावसाहेब दानवेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर काहिंनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. रावसाहेब दानवे हे राज्यातील राजकीय वर्तुळातील एक प्रभावी व्यक्तीमत्तव मानंल जातं मात्र आता त्यांच्या अशा या कृत्यानंतर रावसाहेब दानवे चांगलेच चर्चेत आले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

