BJP चे दिग्गज नेत्यांना मोर्चादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले
पोलिसांचा आमचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका उपस्थित केली. जसं नाक्यावरच्या चोर आणि दरोडेखोरांना पकडतात तसं आम्हाला नेण्यात आलं, असं प्रविण दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आज आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपनं आझाद मैदानात सभा घेतली. या सभेत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी जोरदार टीका केली. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानातील सभेनंतर भाजपनं धडक मोर्चा काढला. आझाद मैदानातून सुरु झालेला भाजपचा धडक मोर्चा मेट्रो सिनेमा इथं आल्यानंतर अडवण्यात आला. भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar), चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी मेट्रो सिनेमा येथे ताब्यात घेतलं. पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. भाजप नेत्यांनी यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांचा आमचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका उपस्थित केली. जसं नाक्यावरच्या चोर आणि दरोडेखोरांना पकडतात तसं आम्हाला नेण्यात आलं, असं प्रविण दरेकर म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

