किसन कथोरे यांचं नागरिकांना आवाहन; म्हणाले, ‘बदलापुरातील घटना निषेधार्ह’, जनतेनं…
बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त नागरिकांचा रेल रोको सुरू आहे. या रेल रोको आंदोलनाला आणि बदलापूरकरांच्या संतापाला कारणीभूत ठरलेला नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवरचा लैंगिक अत्याचार... याच धक्कादायक प्रकरणावर बदलापुरातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूरमध्ये आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये जी घटना झाली. ती घटना निषेध करण्यासारखी असल्याचे म्हणत बदलापूर येथील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी जाहीर निषेध दर्शविला. या प्रकरणावर बोलताना किसन कथोरे म्हणाले, या प्रकरणावर केवळ निषेध व्यक्त करून आपण थांबलो नाही तर संबंधित पोलिसांची बदली ही केली आहे. त्यासोबत शिक्षण संस्थेची चौकशी नेमण्याची आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे हा गुन्हा फास्टट्रॅक वरती घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती त्यानुसार फास्टट्रॅक वरती गुन्हा घेतला जाईल अशा सूचना दिली. तर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आदेशही दिले आहेत. पुढे बोलताना कथोरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, हा संवेदनशील प्रश्न रस्त्यावर येऊन समस्या सुटणार नाहीत याची कायदेशीर पूर्तता केलेली आहे. काल नागरिकांना आवाहन केलं होतं कोणी चुकीच्या मार्गाने जाऊ नका.
Published on: Aug 20, 2024 01:02 PM
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
