Vinayak Raut | ‘भाजपा आमदार Nitesh Rane यांनी पोलिसांना शरण जावं’
भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसांना शरण जावं, हा सल्ला आहे, असं शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलंय.
भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसांना शरण जावं, हा सल्ला आहे, असं शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलंय. केलेल्या गुन्ह्याची कबुलीही त्यांनी द्यावी, असं राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)च्या आजच्या निर्णयानंतर राऊत बोलत होते. कायद्यापासून पळून जायचं आणि पळून पळून पुन्हा न्यायालयानं सांगायचं जामीन नाकारला. अशा पळवाटा शोधण्यापेक्षा कायद्याला शरण जा, असं विनायक राऊत म्हणाले. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं नाकारलाय. पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे, असं राणेंचे वकील देसाई यांनी सांगितलं. पण कोर्टानं ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे, असं देसाई म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

