Hingoli News : भाजप आमदाराला तिरंगा रॅलीमध्येच भोवळ, चक्कर येताच एकच धावाधाव…बघा व्हिडीओ
भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी असून मोठ्या संख्येने महिलांची तिरंगा यात्रेत उपस्थिती दिसून येतेय
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना भोवळ आल्याची बातमी समोर आली आहे. तिरंगा रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना आमदार तानाजी मुटकुळे यांना ही भोवळ आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तानाजी मुटकुळे यांना भोवळ आल्यानंतर त्यांना हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तानाजी मुटकुळे यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती मिळतेय. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिंमत दाखवून दिली. भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे आणि ऑपरेशन सिंदूरचे जगभरात चर्चा आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकड्यांचे कंबरडे मोडले. याच भारतीय सैन्याच्या शूर धाडसी पराक्रमाच्या सन्मानार्थ भाजपाकडून राज्यभरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच हिंगोलीमध्ये तिरंगा रॅलाचे आयोजन करण्यात आले असताना हा प्रकार घडला.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

