AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मला उद्या अटक होणार पण मी समर्थ... अटकेपूर्वी बड्या नेत्याचा फोन, अन्... राऊतांचा आणखी एक गौप्यस्फोट

Sanjay Raut : मला उद्या अटक होणार पण मी समर्थ… अटकेपूर्वी बड्या नेत्याचा फोन, अन्… राऊतांचा आणखी एक गौप्यस्फोट

| Updated on: May 17, 2025 | 11:39 AM
Share

नरकातील स्वर्ग या संजय राऊत पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. या पुस्तकात राऊतांनी देशात खळबळ उडवून टाकणारे काही गौप्यस्फोट केलेत. यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय.

‘बाळासाहेबांचे विचार मानले असते तर त्यांना नरकात जाण्याची वेळ आलीच नसती’, अशी टीका एकनाथ शिंदेंनी राऊतांवर केली.  यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही कुठे म्हटलं आम्ही नरकात गेलो. नरकात तुम्ही गेलात. या शिंदेंचा संबंध काय? अटकेच्या आधी आदल्या दिवशी शिंदेंचा मला फोन होता. अमित शाह यांच्याशी बोलू का म्हणून. मी म्हटलं, काही गरज नाही, असा नवा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, नरक बघा, नरक कसा असतो. म्हटलं वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही. काही गरज नाही. मला उद्या अटक होतेय. मी उद्या तुरुंगात जातोय. मी पळून जाणार नाही. मी बोलू शकतो वर. तुम्ही बोलायची गरज नाही. मी समर्थ आहे, असं म्हणत त्यांनी फटकारलं . तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या पुस्तकावर टीका करताना बालसाहित्य वाचत नसल्याचे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले, हा बालसाहित्याचा अपमान आहे. सरकार पुरस्कार देतं बालसाहित्याला. साहित्य अकादमी पुरस्कार देतं. ज्ञानपीठ पुरस्कार देतं. यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. तेवढीच त्यांची लेव्हल आहे. बाकी काही नाही. त्यांनी पुस्तक वाचावं. सत्य स्वीकारावं, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.

Published on: May 17, 2025 11:35 AM