Sanjay Raut : राऊतांच्या ‘त्या’ दाव्यांवर महायुतीचे टोले, नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट काय?
अमित शहा हे एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते, त्यांना नंतर तडीपारही केलं होतं. शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता, पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते.पवारांनी त्यांच्या स्वभावांनुसार मदत केली, शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला, असल्याचे राऊतांनी म्हटलंय. हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागावे? असा राऊतांचा सवाल आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कशी मदत केली याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला. मात्र संजय राऊत यांच्या या पुस्तकावर महायुतीने गांभीर्याने प्रतिक्रिया न देता टोले लगावल्याचे पाहायला मिळाले.
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं. गोध्रा हत्याकांड दरम्यान सीबीय सह अनेक चौकशांचा ससेमीरा सुरू होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. यादरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकांनी निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं? असा राऊतांचा सवाल आहे. यानंतर महायुतीकडून बघा कशी टोलेबाजी करण्यात आली?
Published on: May 17, 2025 09:50 AM
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
