Sanjay Raut : …म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, तर शहा एका खून प्रकरणात आरोपी, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
आज गोदी मिडीया झालेला प्रत्येक जण त्यावेळी मोदींच्या विरोधात होता. पण ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारा गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी-शहांना मदत केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केलेला आहे.
राऊतांचे गौप्यस्फोट काय?
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं. गोध्रा हत्याकांड दरम्यान सीबीय सह अनेक चौकशांचा ससेमीरा सुरू होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. यादरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकांनी निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं? असा राऊतांचा सवाल आहे.
अमित शहा हे एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते, त्यांना नंतर तडीपारही केलं होतं. शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता, पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते.पवारांनी त्यांच्या स्वभावांनुसार मदत केली, शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला, असल्याचे राऊतांनी म्हटलंय. हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागावे? असा राऊतांचा सवाल आहे.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

