कंबोज स्वत:च मोठे ड्रामेबाज, त्यांच्या नावात काय?; राखी सावंतचे टीकेला प्रत्युत्तर
कंबोज यांनी सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहीणी असल्याचं ट्विट केलं. त्यावरून सुषमा अंधारे मोहित कंबोज यांच्यावर परभणीत टीका केली. तसेच आपण उप कंत्राटदारावर काही बोलणार नाही असा टोला लगावला
मुंबई : भाजपच्या मोहीत कंबोज यांनी, सुषमा अंधारेंवर टीका करताना बॉलिवूड स्टार राखी सावंत हिचे नाव वापरले. तसेच आपल्या ट्विटमधून कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना थेट राखी सावंतशी केली. कंबोज यांनी सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहीणी असल्याचं ट्विट केलं. त्यावरून सुषमा अंधारे मोहित कंबोज यांच्यावर परभणीत टीका केली. तसेच आपण उप कंत्राटदारावर काही बोलणार नाही असा टोला लगावला. त्यानंतर आता राखी सावंत यांनी देखिल कंबोज यांचा समाचार घेत पर आपले नाव राजकारणासाठी वापरलात तर याद राखा असा दम दिला आहे. त्याचबरोबर तुमच्या सारखे राजकारणी खुर्चीसाठी नाटकं करतात, थोडीतरी लाज वाटू द्या असंही सावंत यांनी म्हटलेलं आहे.
Published on: Apr 08, 2023 09:55 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
