BhauBeej 2023 : बहिणीला अशा शुभेच्छा कुणीच दिल्या नसतील; खासदार भाऊ म्हणाला, ताई तू…
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आपली बहिण संगीता शिंदे बोंडे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी अनिल बोंडे यांनी भाऊबीजनिमित्त बहिणीला हटके शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. 'नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे संगीताचे आदर्श आहेत. त्यामुळे तिला आयुष्यात कधीतरी नक्की संधी मिळेल'
अमरावती, १५ नोव्हेंबर २०२३ | भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आपली बहिण संगीता शिंदे बोंडे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी अनिल बोंडे यांनी भाऊबीजनिमित्त बहिणीला हटके शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. बोंडे म्हणाले, सातत्याने शिक्षकांसाठी काम करते. शिक्षकांच्या सुख-दुखःत संगीता नेहमी सहभागी होते. त्यामुळे अमरावती विभागातील शिक्षक वर्गाला संगीता शिंदे बोंडे ही त्यांची प्रतिनिधी म्हणून समोर आली पाहिजे. शासनासोबत चर्चा करून तिने पुढे यायला हवं, असं अनिल बोंडे म्हणाले. पुढे ते बहिणीला उद्देशून असेही म्हणाले, तू जे काम करते, ते चांगलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संगीताचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांना समोर ठेऊन ती शिक्षक वर्गासाठी रात्रंदिवस झटत असते. याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला आयुष्यात कधी तरी मिळेलच, अशी आशा व्यक्त करत लवकरच तू आमदार हो अशा शुभेच्छाही अनिल बोंडे यांनी आपली बहिण संगीता हिला दिल्यात.