Pimpri मध्ये भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने
भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा तिथं आला असता एका अज्ञात व्यक्तीनं या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने सामने आले होते. पोलिसांनी यावेळी लाठीमार देखील केला होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा तिथं आला असता एका अज्ञात व्यक्तीनं या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेन चप्पल भिरकवल्याची घटना घडल्यानं पिंपरीमध्ये खळबळ उडाली आहे. हा मुद्दा जास्त तापण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
