शरद पवार यांना वयाच्या ८४ व्या वर्षी लोकं का सोडताय? भाजपच्या बड्या नेत्याची सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका
VIDEO | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बानवकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
सिंधुदुर्ग, २० ऑक्टोबर २०२३ | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बानवकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ८४ वर्षांच्या शरद पवार यांना एवढे लोक का सोडून जातात असा सवाल करत याचं आत्मपरिक्षण सुप्रिया सुळे यांनी करावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. इतकंच नाही तर स्वतःचं घर का फुटलं याचं देखील आत्मपरिक्षण करावे, असेही बावनकुळे यांनी म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. यासह त्यांनी आपल्या सरकारने केंद्रात ६५ वर्ष काँग्रेसने केलेले पाप धुवून काढले. मागच्या १५ वर्षात १८ लोक काश्मीरला गेले नाहीत पण मागच्या वर्षी एक कोटी ८५ लाख लोक गेले. १४० कोटी लोकांचे भवितव्य ठरवण्यासाठी १९२ महिला खासदार होणार आहेत. ३३ टक्के महिलांचा पहिला कायदा नवीन संसद भवनात केला, असे म्हणत पुन्हा मोदीचं निवडणून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

