पाठिंबा नाही पण दिली ही ऑफर, चंद्रशेखर बावनकुळे आणि सत्यजीत तांबे यांचं साटलोट काय ?
सत्यजित तांबे यांना कोणती दिली खुली ऑफर, काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये येण्यास खुली ऑफर दिली आहे. सत्यजित तांबे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकीमध्ये मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या जागांवर यापूर्वी विधानपरिषद निवडणूकीत जे निकाल आले, त्यापेक्षा हे निकाल चांगले असतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
पदवीधर शिक्षक मतदानाच्या निकालात भाजप आणि युतीला जास्त यश मिळालं असेल. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं आहे. त्यामुळे निकाल चांगले येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले आहेत. सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. तर सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे म्हणत बावनकुळेंनी तांबेंना खुली ऑफर दिली आहे.
Published on: Jan 31, 2023 11:10 AM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
