Breaking | गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञांताकडून दगडफेक

भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीचा काच फुटला आहे. मात्र, गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI