Raj Thackeray नी मोदी, योगी, उत्तर भारतीय, संत यांच्यापैकी कोणाची तरी माफी मागावी – Brij Bhushan Singh
ब्रिजभूषण यांनी थेट भाजप कोंडी करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे आवाहन केले आहे.
आयोध्या : सध्या देशात जे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून जे राजकारण सुरू आहे त्याचे रणशिंग महाराष्ट्रात फुकण्यात आले आहे. हे रणशिंग मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी फुकंले. तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्रातील मशींदीवरील भोंगे हे उतरलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. तर आपण अयोध्येला जात श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर महाराष्ट्रात भाजपने आपल्या सोबत मनसेला घेत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे आता भाजपचीच डोकेदुख वाढण्याचे चित्र दिसत आहे. याचे कारण कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण सिंह (MP Brijbhushan Singh). ब्रिजभूषण यांनी थेट भाजपला फाट्यावर मारत राज ठाकरे यांना विरोध करत खुले आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे आवाहन केले आहे. आणि जर तसे केले नाही तर राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना डीवचताना, राज ठाकरे यांनी मोदी, योगी, उत्तर भारतीय, संत यांच्यापैकी कोणाची तरी माफी मागावी असं म्हटलं आहे
Published on: May 14, 2022 05:33 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
