ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट…
दलाल भावेश कावरेच्या एका जाहिरातीमुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. ताडदेव येथील एका गृहप्रकल्पात मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही, अशी अट त्याने घातली. यावरुन ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाईंसह इतर राजकीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
घर विक्रीचे व्हिडीओ तयार करणारा भावेश कावरे याने ताडदेव येथील एका गृहसंकुलासाठी केलेल्या जाहिरातीमुळे नवा वाद पेटला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीत, मांसाहार करणाऱ्यांना गृहप्रकल्पात घर मिळणार नाही अशी अट घालण्यात आली आहे. यावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी फ्लॅट चाहिये तो मिल जायेगा या वाक्यामुळे भावेश कावरे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. मात्र, त्याच्या ताज्या जाहिरातीत नॉनव्हेज खाते हो तो यहा पे घर नही मिलेगा, अगर आप प्युअर व्हेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिये नंबर पे कॉल करो असे दोनदा म्हटले आहे. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी टीका होत आहे. ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी कावरेला थेट दिसेल तिकडे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
इतर राजकीय नेत्यांनीही कावरेच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या स्टाईलने याचा समाचार घेण्याचा इशारा दिला आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी तर मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या वादग्रस्त जाहिरातीमुळे दलाल भावेश कावरे अडचणीत सापडला आहे.
Published on: Aug 13, 2026 01:56 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

