Deepak Kesarkar | बोलणार नाही म्हणत दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
आज एक मनुष्य पुरपरिस्थितीशी झुंजतोय आणि तुम्हाला मात्र राजकारण सुचतंय थोडी तरी माणुसकी दाखवा, असेही केसरकर उद्धव ठाकरेंना म्हणाले.
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात किती तास काम केलं याचा विचार करावा आणि मगच दुसऱ्यावर टीका करावी, असा टोला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकर प्रथमच आपल्या मतदार संघात दाखल झाले. सावंतवाडी येथील गांधी चौक येथे केसरकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर काहीच बोलणार नाही म्हणत केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आज एक मनुष्य पुरपरिस्थितीशी झुंजतोय आणि तुम्हाला मात्र राजकारण सुचतंय थोडी तरी माणुसकी दाखवा, असेही केसरकर उद्धव ठाकरेंना म्हणाले.
Published on: Aug 14, 2022 01:10 AM
Latest Videos
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
