Avaada : ज्या कंपनीमुळे ‘बीड’चा वाद, त्याच कंपनीत चोरट्यांचा डल्ला, 14-15 जणं तोंडाला मास्क बांधून आले अन्…
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला आज चार महिने उलटले. या हत्या प्रकरणामुळे बीडमधील आवादा कंपनी देखील तितकीच चर्चेत आली होती. याच कंपनीत तब्बल १२ लाखांच्या केबलची चोरी झाल्याचे समोर आले आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले. दरम्यान, वाल्मिक कराड याने ज्या कंपनीकडे एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले होते, त्याच आवादा कंपनीत तब्बल १२ लाखांची चोरी करण्यात आली. या चोरीच्या घटनेनंतर आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तोंडाला मास्क बांधून आलेल्या १४ ते १५ जणांनी चोरी केल्याची माहिती मिळतेय. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या कंपनीच्या खंडणीप्रकऱणावरून हत्या झाली त्या आवादा कंपनीत मोठी चोरी झाली आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना मारहाण करण्याची धमकी देत १४ ते १५ जणांनी चोरी केली. १४ ते १५ जणांच्या टोळक्यांनी तोंडाला मास्क बांधून आवादा कंपनीत १२ लाखांच्या केबल्सची चोरी केल्याची माहिती मिळतेय. बीडच्या केज पोलीस ठाण्यात या चोरीच्या घटनेसंदर्भात कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा देखील नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

