Saamana Editorial: ‘सन्मानाने बोलवा’ बंडखोरांच्या अटीला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर, काय म्हटलंय? जाणून घ्या…
'दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? 'मातोश्री' ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो' अशा शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजपवर सामनातून टीका करण्यात आली.
मुंबई : “मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ” असं वक्तव्य करणाऱ्या बंडखोर शिवसेना आमदाराला शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा शिवसेनेतील सामना दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं पाहायला मिळतंय. बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परतावेत, यासाठी उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली होती. यावरुन शिंदे गटातील आमदारांनी केलेल्या वक्तव्यांच्या समाचार सामना अग्रलेखातून घेण्यात आला. ‘दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो’ अशा शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजपवर सामनातून टीका करण्यात आली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

