Caste Census : जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार
देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता 2027 मध्ये या जनगणनेला सुरुवात होणार आहे.
जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना आणि जातीय जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड आणि लदाखमध्ये 2026 ला जनगणना होईल. यात पहिलं टप्पा 1 ऑक्टोबर 2026 ला, तर दूसरा टप्पा 1 मार्च 2027 ला पूर्ण होईल, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जनगणना कधी होणार हे निश्चित नव्हते. आता जनगणना करण्याची तारीख समोर आली असून जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

