पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कोल्डवॉर? दादा सोबत आल्यानं दुसऱ्या दादांची अडचण?
VIDEO | पुण्यातील कामात हस्तक्षेप वाढल्याने अन् दादा सोबत आल्यानं दुसऱ्या दादांची अडचण? अजित पवार यांच्यामुळे चंद्रकांत पाटील वैतागले? थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय केली तक्रार?
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | पुण्यातील कामात हस्तक्षेप वाढल्याने चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सध्या पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरू आहे. सोमवारी झालेली गणेशोत्सवासंदर्भात स्थानिक प्रशासनाची बैठक या वादाला कारणीभूत ठरली. ही बैठक चंद्रकांत पाटील यांनी बोलवली होती. दरवर्षी ही बैठक पुण्यातील पालकमंत्री बोलवत असते. या बैठकीला अचानक अजित पवार यांची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः अजित पवार यांनी संबोधित केले. पुणे जिल्ह्याच्या विकास कामासंदर्भात अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावलाय. जिल्हा नियोजनाचा ४०० कोटींच्या निधीचा प्रस्तावही अजित दादा यांच्यामुळेच प्रलंबित असल्याची चर्चाही सुरू आहे. बारामती, इंदापूरच्या विकास कामांच्या उद्धाटनालाही चंद्रकांत पाटील गैरहजर राहिले. अजित पवार ज्या बैठका घेत आहेत, त्या बैठकांना भाजप आमदारांना बोलावलं जात नसल्याचीही तक्रार होती…बघा स्पेशल रिपोर्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

