Special Report | ‘भाजपला मतदान करा, पोटभर जेवा’!

देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यावेळी पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या ऑफरवर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसंच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI