ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार काय?; चंद्रकांतदादा म्हणतात, मी आशावादी नाही

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करेल असं वाटत नाही. तशी दानत या सरकारची नाही. त्यामुळे मी आशावादी नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करेल असं वाटत नाही. तशी दानत या सरकारची नाही. त्यामुळे मी आशावादी नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना काळात आघाडी सरकारने हजार कोटीचा चेक दाखवला होता. तो कुठे गेला? व्हॅक्सिन खरेदी करण्यासाठीचा तो चेक होता. तो कुठे गायब झाला माहीत नाही. त्यानंतर व्हॅक्सिनचा खर्चही केंद्रानेच केला. आता पेट्रोल-डिझेलवरील जीएसटी त्यांनी कमी केला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारने कमी केला नाही. केंद्राकडे बोट दाखवलं. शेवटी केंद्रानेच कमी केला. केंद्राने अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे पाच आणि दहा रुपयाने पेट्रोल डिझेलवरील भाव कमी होतील. आता महाराष्ट्रानेही कर कमी केला पाहिजे. अबकारी कर कमी केल्याने आपणही इंधनावरील दर कमी करू अशी काही दानत महाराष्ट्र सरकारची नाही. त्यामुळे मी काही आशावादी नाही, असं पाटील म्हणाले.

Published On - 2:03 pm, Thu, 4 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI