Satara | संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीवर चंद्रकांत पाटलाची सडकून टीका

संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळतात, दिल्लीला गेले की राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळतात. खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करायला हे तयार आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

‘संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळतात, दिल्लीला गेले की राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळतात. खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करायला हे तयार आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी वरुन डोळे वटारले असतील. कारण, ममता बॅनर्जी म्हणाल्या ना की, यूपीए कुठे आहे? राहुल गांधी तर वर्षातील जास्त दिवस देशाबाहेरच असतात. त्यावेळी डाव्या बाजूला उजव्या बाजूला होतील. सोनिया गांधींनी डोळे वटारले असतील, मग लगेच त्यांची समजूत काढायची की, नाही ओ त्या आल्या. आमच्या संस्कृतीमध्ये आलं की त्यांचं स्वागत करायचं असतं’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या 27 टक्के जागा वगळून ऊर्वरित 73 टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI